मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज : सामान खरेदी करण्यासाठी मोहटादेवी चौकात गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकन्या गणेश घुगे (वय ३६, रा. गट क्रमांक ९, वडगाव कोल्हाटी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिवकन्या घुगे या सामान खरेदी करण्यासाठी मोहटादेवी चौक येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या घटनेनंतर घुगे यांनी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चौथे करीत आहेत.
________________
-
नागरिकांच्या सवयीत बदल, गावाच्या स्वच्छतेत सुधारणा! रांजणगाव शेणपुंजीचा उपक्रम ठरतोय इतर गावांसाठी आदर्श!

Share Total Views: 8न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे) : छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करत रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत आणि नागार्जुन एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील स्वच्छतेत सकारात्मक बदल दिसून येत असून,…
-
वडगाव कोल्हाटीतील आनंद बुद्ध विहारात वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न; भदंत करुणानंदजी महाथेरो यांच्या धम्मदेशनेने श्रद्धावान मंत्रमुग्ध

Share Total Views: 9‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या तीन महिन्यांच्या सामूहिक वाचनाची सांगता; धम्म रॅली, त्रिशरण-पंचशील प्रदान आणि भीमगीताने कार्यक्रमाला रंगत वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सावित्रीबाई फुले नगर, प्रज्ञानगर परिसरातील आनंद बुद्ध विहारात सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी वर्षावास सांगता समारोह मोठ्या उत्साहात आणि धम्ममय वातावरणात पार पडला. पूजनीय भदंत करुणानंदजी महाथेरो यांच्या…
-
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दत्ता वर्पे यांचे सिडको प्रशासनाला पत्र; बंद विहिरी-बोअरवेल स्वच्छ करण्याची मागणी

Share Total Views: 18शासनाच्या पाणीटंचाई निवारणाच्या सूचनांदरम्यान पुढाकार; स्वच्छ पाणीपुरवठा, हातपंप दुरुस्ती आणि टँकर सुरू करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागांत पाण्याची गरज आहे, त्या ठिकाणी पाणीपुरवठा करावा आणि परिस्थितीनुसार विविध उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.…
