

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा ब्युरो रिपोर्ट)
बिडकीन (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे पोलिसांनी विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवारी बाळगणाऱ्या किशोर सरोदे (वय 25, रा. केसापुरी) याला अटक केली. 21 जून 2025 रोजी त्याच्या घरावर छापा टाकून तीन धारदार तलवारी व म्यान जप्त करण्यात आले. आरोपीने शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर कलम 4/25 हत्यार कायदा व कलम 135 म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोज जाधव यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर करत आहेत