July 7, 2025
img_9323-1.jpg

न्यूज मटाठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर | १८ जून २०२५

वाळूज एमआयडीसी, कमळापूर व जोगेश्वरी परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी एकाच दिवशी छापा टाकून जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या कारवायांमध्ये एकूण ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून ९० हजारांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खाली सविस्तर तपशील:

१. कमळापूर – एनडीपीएस पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा (१३ अटकेत)
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमळापूर येथे गुप्त माहितीवरून एनडीपीएस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १३ जणांना रंगेहात पकडले. यात रोख रक्कम ५,५२० रू, ९ मोबाईल फोन्स, असा एकूण ९० हजार ४९० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एनडीपीएस पथक प्रमुख पो.नि. गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लालखान पठाण, सतीश जाधव, संदीप धर्मे, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, छाया लांडगे यांनी यांनी केली.

२. जोगेश्वरी – पत्याच्या क्लबवर छापा, सात जण अटकेत –
साबयर पोलीस ठाण्याच्या पथकाने जोगेश्वरी गावातील आंबेडकर नगरमध्ये श्रीकांत रणवीर यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर छापा टाकला. या ठिकाणी सात जण तीनपत्ती नावाचा जुगार खेळताना आढळले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे याच्या मार्गदशनाखाली करण्यात अली असून पो.अं. अल्ताफ शेरखान पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांच्याकडून लेखी परवानगी घेऊन पंचाच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. असून यात श्रीकांत राहुल रणवीर (३५),आकाश शहाजी शाक्यरत्न (३०), सुनिल दगडु खिल्लारे (४०), दादाराव नागोराव वाकळे (३५) श्याम सखाराम नरवडे (३८),एकनाथ आंबादास गायकवाड (७०),राजेश सुधाकर गायकवाड (३२) आरोपींना अटक करण्यात अली. आरोपींकडून पत्याचे कॅट, मोबाईल फोन्स, रोख रक्कम जप्त करण्यात आली. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

३. वाळूज – “मावशी हॉटेल” वर अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा

वडगाव कोल्हाटी – तिसगाव रोडवरील “मावशी हॉटेल” मध्ये अवैधपणे मद्यसेवन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सपोनि मनोज शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी केली पो.अ. योगेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चंद्रकांत रामदास राऊत – हॉटेल मालक,खंडु अर्जुन घ्यार,भुषण गोपाल पाटील,चेतन नंदराव पाटील,भरत कारभारी जाधव,राजेंद्र पांडुरंग फेफाळे,अप्पासाहेब भिमराव कुंदे,राहुलसिंग रामकबलसिंग,राजकुमार मुकिंद पुंडगे,रामदास श्रावण पाचरणे हॉटेलमधील दोन मदतनीसांचाही समावेश तपासाच्या कक्षेत आहे. या तीनही घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या एकाच दिवशीच्या तिहेरी कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांतून पोलिसांच्या त्वरित व प्रभावी कारवाईचं कौतुक होत आहे. सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.


error: Content is protected !!