July 7, 2025
ad4d446f-96a5-4ecb-a3a9-872588acc7b2

छत्रपती संभाजीनगर | ऑर्किड जुनिअर कॉलेजने २०२४-२५ मध्ये झालेल्या MHT-CET परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या परीक्षेत या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उच्च गुणांसह आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, संपूर्ण संस्थेचा गौरव वाढवला आहे.

या परीक्षेत आदित्य खवले याने ९९.६४ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर मोहितकुमार सिन्हा – ९६.०१ टक्के, शुभम ताठे – ९५.२५ टक्के, आणि सारंगी आवारे – ९४.११ टक्के गुण मिळवत उत्तम यश मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन हे महत्त्वाचे घटक ठरले. संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या घवघवीत यशामुळे ऑर्किड जुनिअर कॉलेजचा शैक्षणिक दर्जा अधिकच उंचावला असून, संस्थेचा प्रगतीचा आलेख वधारत असल्याचे या निकालातून स्पष्ट होते.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!