July 7, 2025
IMG_5706

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर – जोगेश्वरी परिसरात १३ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, घरासमोर अंगणात खेळत असताना सुभाष गंगाधर कर्डक या इसमाने मुलीचा हात पकडून पाठीला, खांद्याला आणि गालाला हात लावून अश्लील चाळे केले.

घडलेला प्रकार रडत रडत मुलीने आईला सांगितल्यावर तिने आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने फिर्यादी महिलेस देखील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!