July 7, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

रांजणगाव शेपू येथील नर्सरी कॉलनीमध्ये असलेल्या खाजगी शिकवणी असलेल्या टॉपर क्लासेसच्या ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीमध्ये शिकत असलेल्या १० वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आज दि १५ रोजी सकाळी उघड झाली आहे. सुभाष जाधव वय ४५ शिवनेरी कॉलनी रा रांजणगाव शेपुं. मूळ गाव हिवरे आश्रम बुलढाणा असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षापासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये दीड वर्षापासून टॉपर क्लासेस नावाने शिकवणी आहे, एम ए इंग्रजी एम एड असलेल्या सुभाष जाधव तिघे शिक्षक मिळून सुरू केली होती. तीन दिवसपापूर्वी या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून सुभाषने बाथरूम मध्ये नेवून बलात्कार केला. हा सर्व प्रकार घरी सांगितला तर आई वडिलाचे तुकडे करेल अशी धमकी दिली. मुलगी क्लासला जात नसल्याने आई वडिलाने विचारपूस केली मुलीने सर्व हकिकत सांगितली. घटना माहीत होताच जमावाने शिक्षकाला चांगला चोप दिला.सध्या आरोपी घाटी दवाखान्यात उपचार घेत असून उपचारणानंतर पोलीस आरोपीला ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहे

घाणेरड्या कृत्यामुळे दीड वर्षापूर्वी सुभाषला शाळेतून काढले होते

सुभाष जाधव हा रांजणगाव शेपू येथील एका खाजगी शाळेत शिकवत होता परंतु शाळेत सुभाषच्या गैर कृत्य दिसत असल्याने त्याला शाळेने काढून टाकले होते, अशी माहिती आहे, त्यानंतर त्याने खाजगी शिकवणी सुरू केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!