
छत्रपती संभाजीनगर : पंचायत समिती सभापती निवडीची प्रक्रिया आज पार पडत असताना वाळूज महानगर परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात असताना उबाठा गटातील तीन पंचायत समिती सदस्य अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती सदस्य लता कानडे, दत्तात्रय वर्पे आणि सतीश हिवाळे यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सभापती निवडीच्या आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, या तिघा सदस्यांशी संपर्क होत नसल्यामुळे विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. काही राजकीय वर्तुळात हे सदस्य दुसऱ्या गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगू लागली आहे, तर काहीजण हे केवळ राजकीय डावपेच असल्याचे सांगत आहेत.
सभापती निवडीत नेमकी कोणती राजकीय समीकरणे जुळणार आणि या तिघा सदस्यांची भूमिका काय राहणार याकडे वाळूज महानगर परिसरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवड प्रक्रियेदरम्यान हे सदस्य संपर्कात येतात का किंवा थेट मतदानावेळी उपस्थित राहतात का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे वाळूज एमआयडीसी परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून सभापती निवडीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
••••
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


