
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा – संदीप लोखंडे
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरात दिवाळीनिमित्त कामगारांना कंपन्यांकडून वेतन व बोनस मिळाले, याचा फायदा घेत, दि १९ ऑक्टबर रोजी कोलगेट चौकात एका कामगाराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन लुटारूंना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत पकडण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी कोलगेट चौकात दोन अनोळखी लुटारूंनी एका कामगाराला चाकूचा धाक दाखवून ८ हजार रुपये लुटले होते. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी बीकेटी कंपनीजवळ थांबलेले आहेत. त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे —
कृष्णा भास्कर चक्रे (वय ३०, व्यवसाय मजुरी) आणि गजानन फकीरा जाधव (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. ओम साई नगर, कमलापूर रोड, रांजणगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांनी एक दुचाकी, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींवर वाळूज एमआयडीसी, छावणी आणि वेदांत नगर पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दिनेश बन, आमदार धीरज काबलिये, जालिंदर रंधे, सुरेश कचे, हनुमान ठोके, दीपक जाधव, सुरेश भिसे, वैभव गायकवाड, रवींद्र गायकवाड, शिवनारायण नागरे, जयेश साळुंखे, सचिन ठोकळ, संतोष बमनाथ, संदीप तागड, बाळासाहेब आंधळे आणि राजाभाऊ कोल्हे यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे वाळूज परिसरात निर्माण झालेल्या दहशतीला आळा बसला असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे..
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





