
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर :
बजाजनगरातील प्रताप चौकात पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यात धारदार शस्त्राने वार करून फायरिंगचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी काही तासांतच तीन आरोपींना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील आरोपी सांगळे याच्या टोळीतील आणखी काही जणांकडे शस्त्र असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक व वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अंमलदार यांनी सापळा रचून साजापूर चौफुली भागात कारवाई केली. दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थार काळ्या रंगाची फॅन्सी नंबर असलेली MH20HH5214 कार अडवण्यात आली. या कारमध्ये पाच जण आढळून आले. त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्र मिळून आले. कार आणि शस्त्रांसह एकूण १३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे :
• शरद भगवान कदम (वय 29, रा. गट क्र. 07, स्वस्तिक सिंटी कमानजवळ, शेखापुर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
• नितेश श्रीराम राठोड (वय 29, रा. फुलेनगर, पंढरपूर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
• वैभव बाळासाहेब शिंदे (वय 18, रा. गट क्र. 05, शिवशंभोनगर, शेखापुर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
• महादेव लक्ष्मण पवार (वय 23, रा. टाऊन हॉल, जयभीमनगर, गुलाबवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
• सुमित कैलास खोतकर (वय 18, व्यवसाय – रा. पंढरपूर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
बजाजनगरातील जीवघेण्या हल्यातील चौथा आरोपी खोटकर अटक.. बजाजनगरमध्ये झालेल्या हल्यातील चौथा आरोपी सुमित खोटकर हा फरार होता, या कारवाईत त्याला अटक करण्यात अली आहे.
अटक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
॰॰॰॰
-
सिडको-वाळूज पाणी प्रश्नावर आंदोलन तीव्र; दत्तात्रय वर्पे आजपासून अमरण उपोषणावर
Share Total Views: 11 छत्रपती संभाजीनगर : सिडको व वाळूज महानगर परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर पंचायत
-
पंढरपूर गावातील पाणीटंचाईवर उपाय; पंचायत समितीकडून तीन टँकर सुरू
Share Total Views: 43 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – पंढरपूर : गावामध्ये
-
दहावीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
Share Total Views: 15 वाळूज महानगर : इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा



