नगर-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज, वाळूज महानगरच्या वतीने शुक्रवारी (११ सप्टेंबर) पंढरपूर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

रास्ता रोकोमुळे नगर-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.
-
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वाळूजमध्ये रास्ता रोको

Share Total Views: 2 नगर-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज
-
नियमांचे उल्लंघन; वाळूजमधील पिझ्झा हटचा अन्न परवाना निलंबित

Share Total Views: 5,872 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे
-
अख्खं कुटुंब संपल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर; खवड्या डोंगरावर काटेरी कुंपण अन् CCTV

Share Total Views: 10 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर : तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरावरून
