लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

बजाजनगर | प्रतिनिधी
बजाजनगरातील गोरख वाघ चौक परिसरात असलेल्या रेवनसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दुकानातील CCTV कॅमेरे फोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरटे चारचाकी वाहनातून दुकानाजवळ आले होते. त्यांनी रेवनसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानातील CCTV कॅमेरेही फोडण्यात आले. मात्र, दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट तोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे दुकानातील सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी होण्यापासून बचाव झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. चोरटे चारचाकी वाहनातून आल्याची माहिती असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, बजाजनगर परिसरात दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,258 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 5 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 6 Share
