c686afc8-2d59-4562-bc9b-e6236a6c5052.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वडगाव कोल्हाटी : दिव्यांग बांधव-भगिनींना आर्थिक आधार देण्यासाठी वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या वतीने ५ टक्के दिव्यांग राखीव निधीचे वाटप करण्यात आले. गावातील एकूण ३२४ दिव्यांग व्यक्तींची ग्रामपंचायतीकडे नोंद असून, त्यापैकी २२७ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा निधी धनादेशाद्वारे वितरित करण्यात आला.

ग्रामपंचायत सरपंच सुनीलभाऊ काळे, ग्रामसेवक भालराव साहेब, माजी पंचायत समिती सदस्य राजेश साळे पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी मिसळ साहेब आणि आकाश मगर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे मार्गदर्शक पारचंदजी साकला साहेब, जोतीरामजी जाधव साहेब, प्रहारचे पश्चिम तालुका अध्यक्ष बद्रीनाथभाऊ लघाने पाटील, पश्चिम उपतालुका प्रमुख दत्ताभाऊ वाकडे, किशोरभाऊ फेगडे, वाळूज महानगर अध्यक्ष शिवाजी दांगट राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच लक्ष्मणभाऊ धडेकर, सोपान ढसाळ, कैलासभाऊ साळे पाटील, सरोजा भोसले, गीताबाई पडघन, आशाबाई सास्ते, लताबाई पिंपळे, वंदनाबाई बोराडे, यश कोळेकर, त्रिभुवन यांच्यासह दिव्यांग बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या ३२४ दिव्यांग व्यक्तींपैकी २२७ जणांना पहिल्या टप्प्यात निधीचा लाभ मिळाला असून, उर्वरित लाभार्थ्यांना निधी वितरणाबाबत पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. या आर्थिक मदतीमुळे दिव्यांग बांधवांना दैनंदिन गरजांसाठी हातभार मिळणार आहे.

…..