IMG-20261019-WA0019

सिडको महानगरातील घटना; १८ वर्षीय विद्यार्थ्याची पोलिसांत तक्रार

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

वाळूज महानगर : सिडको महानगर क्रमांक १ येथील पाण्याच्या टाकीजवळ दांडिया कार्यक्रमादरम्यान सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार करून जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. संदेश सोमनाथ साळवे (रा. गट क्रमांक २१५, हॉटेल निसर्गमागे, तिसगाव चौफुली परिसर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याने प्रसाद गायकवाड याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संदेश साळवे हा त्याचा मित्र आदित्य वाघ याच्यासोबत सिडको महानगर क्रमांक १ येथील पाण्याच्या टाकीजवळ दांडिया कार्यक्रम पाहत उभा होता. त्यावेळी मयूर जाधव, रोहन जाधव, प्रसाद गायकवाड व इतरांमध्ये भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी संदेश पुढे गेला. त्याने प्रसाद गायकवाड याला बाजूला केले असता, त्याचा राग आल्याने प्रसादने शिवीगाळ सुरू केल्याचा आरोप आहे. संदेश त्याला समजावून सांगत असताना प्रसादने हातातील लोखंडी कड्याने त्याच्या डोक्यावर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

डोक्यातून रक्त येत असल्याचे लक्षात येताच मित्र आदित्य वाघ याने संदेशचा चुलत भाऊ अभिजीत साळवे याला फोन करून बोलावले. त्यानंतर संदेशला उपचारासाठी वाळूज येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी वैद्यकीय मेमो देऊन त्याला घाटी रुग्णालयात पाठविले. उपचार घेऊन घरी परतल्यानंतर संदेशने पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली आहे.


  • दांडिया पाहताना भांडण सोडवणे पडले महागात; लोखंडी कड्याने डोक्यावर वार

    दांडिया पाहताना भांडण सोडवणे पडले महागात; लोखंडी कड्याने डोक्यावर वार

    Share       Total Views: 3सिडको महानगरातील घटना; १८ वर्षीय विद्यार्थ्याची पोलिसांत तक्रार न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर : सिडको महानगर क्रमांक १ येथील पाण्याच्या टाकीजवळ दांडिया कार्यक्रमादरम्यान सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार करून जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. संदेश सोमनाथ साळवे (रा. गट क्रमांक २१५, हॉटेल…


  • ‘इन्स्टा’वर ओळख, प्रेम अन् लग्न; पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ आई-वडिलांना पाठवल्याचा आरोप!

    ‘इन्स्टा’वर ओळख, प्रेम अन् लग्न; पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ आई-वडिलांना पाठवल्याचा आरोप!

    Share       Total Views: 6 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर : इन्स्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी विवाहही केला. मात्र, लग्नानंतरच्या वादातून पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ तिच्या आई-वडिलांसह बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तसेच, हे व्हिडिओ सोशल मीडियावर…


  • ३३ वर्षे घाम गाळला, आता हातात काय? वाळूजमधील विप्रोच्या २०८ कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह!

    ३३ वर्षे घाम गाळला, आता हातात काय? वाळूजमधील विप्रोच्या २०८ कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह!

    Share       Total Views: 23छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) : वयाची उमेदीची वर्षे कंपनीच्या सेवेत घालवली… आयुष्याचा मोठा काळ मशीनच्या आवाजात, मेहनतीत आणि कुटुंबाच्या स्वप्नांसाठी राबण्यात गेला… मुलांच्या शिक्षणासाठी, घरखर्चासाठी आणि भविष्याच्या आशेने आयुष्यभर कष्ट केले. मात्र, आता याच कामगारांच्या आयुष्यात अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. वाळूज एमआयडीसीतील विप्रो एंटरप्रायझेस प्रा. लि. कंपनी…



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *