छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; विशेष पोलीस पथकाची मोठी कामगिरी!
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज, छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक परिसरासह छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीच्या एकूण १४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा तपास पुढे जाण्याची शक्यता आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध
वाळूज MIDC औद्योगिक परिसरात कामगारांच्या तसेच नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू होते. याचदरम्यान पोलीस ठाणे MIDC वाळूज येथील विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला.
या तपासातून पप्पू कृष्ण उर्फ किसन पवार (वय ३० वर्षे, रा. नांदर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण १४ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
या कारवाईमुळे चोरीच्या दुचाकी परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींच्या अनुषंगाने आणखी किती चोरीचे गुन्हे उघडकीस येतात, याकडे लक्ष लागले आहे. आरोपीचे आणखी साथीदार आहेत का, तसेच दुचाकी चोरीच्या इतर घटनांशी त्याचा संबंध आहे का, याचा तपास विशेष पथकाकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप तसेच पोलीस अंमलदार जालिंदर रंधे, सूरज अग्रवाल, रोहित चिधाळ, नितीन इनामे, समाधान पाटील, सचिन सलामपुरे, लखन गुसिंगे, प्रकाश वाघ, वैभव गायकवाड, सचिन ठोकळ आणि दीपक जाधव यांनी सहभाग घेतला.
तसेच पाचोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन पंडित आणि पोलीस हवालदार ताराचंद घडे यांनीही चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यासाठी मदत केली.
वाळूज MIDC पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दुचाकी चोरीच्या आणखी घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
-
दुचाकी चोराला अटक; तब्बल १४ मोटारसायकली जप्त!

Share Total Views: 2छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; विशेष पोलीस पथकाची मोठी कामगिरी! न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज, छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक परिसरासह छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई…
-
नवरात्रात भगर खाताना सावधान! बुरशीग्रस्त भगरीमुळे अन्नविषबाधेचा धोका; FDA च्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

Share Total Views: 11छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | (NEWS MARATHWADA) नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने केले आहे. भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना तसेच त्यांची खरेदी व साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनाने जनजागृती पुस्तिकेद्वारे नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अन्न व…
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्लिफ ऑल डे डायनिंग’चा अन्न परवाना निलंबित; FDA ची कडक कारवाई

Share Total Views: 8NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील सातारा परिसरातील चाटे स्कूल रोड येथील ‘मे. क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. Safe Food…
