October 18, 2026
IMG-20241029-WA0021

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

वाळूज महानगर : इन्स्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी विवाहही केला. मात्र, लग्नानंतरच्या वादातून पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ तिच्या आई-वडिलांसह बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तसेच, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार २४ वर्षीय महिलेने केली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्यामाहितीनुसार, संबंधित महिलेची सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर संशयित आरोपीशी ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन पंढरपूर, वाळूज येथील एका लॉजवर तसेच वडगाव कोल्हाटी येथील भाड्याच्या खोलीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान दोघांचे खासगी व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आल्याचेही महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी आरोपीने तिला पुन्हा लॉजवर बोलावले. तेथे विवाहाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी दोघांनी लाडगाव येथील विवाह संस्थेत हिंदू पद्धतीने विवाह केला. मात्र, विवाहानंतरही ते वेगवेगळे राहत होते.

१४ ऑक्टोबर रोजी आरोपी महिलेच्या राहत्या घरी आला आणि तिचे सिमकार्ड घेऊन गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेने त्याच्याकडे जाण्यास नकार दिला. यामुळे आरोपीने दोघांच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर रात्री उशिरा आरोपीने महिलेचे खासगी व्हिडिओ आणि विवाहाचे फोटो तिच्या आई, वडील आणि बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवले. यामुळे नातेवाइकांमध्ये आपली बदनामी झाल्याचा आरोप महिलेने केला आहे.

१५ ऑक्टोबर रोजी महिला आरोपीला जाब विचारण्यासाठी वडगाव कोल्हाटी परिसरात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारानंतर महिलेने नातेवाइकांसह पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी सुरुवातीला वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र, घटनास्थळ वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


  • ‘इन्स्टा’वर ओळख, प्रेम अन् लग्न; पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ आई-वडिलांना पाठवल्याचा आरोप!

    ‘इन्स्टा’वर ओळख, प्रेम अन् लग्न; पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ आई-वडिलांना पाठवल्याचा आरोप!

    Share       Total Views: 5 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर : इन्स्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी विवाहही केला. मात्र, लग्नानंतरच्या वादातून पतीने पत्नीचे खासगी व्हिडिओ तिच्या आई-वडिलांसह बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तसेच, हे व्हिडिओ सोशल मीडियावर…


  • ३३ वर्षे घाम गाळला, आता हातात काय? वाळूजमधील विप्रोच्या २०८ कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह!

    ३३ वर्षे घाम गाळला, आता हातात काय? वाळूजमधील विप्रोच्या २०८ कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह!

    Share       Total Views: 19छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) : वयाची उमेदीची वर्षे कंपनीच्या सेवेत घालवली… आयुष्याचा मोठा काळ मशीनच्या आवाजात, मेहनतीत आणि कुटुंबाच्या स्वप्नांसाठी राबण्यात गेला… मुलांच्या शिक्षणासाठी, घरखर्चासाठी आणि भविष्याच्या आशेने आयुष्यभर कष्ट केले. मात्र, आता याच कामगारांच्या आयुष्यात अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. वाळूज एमआयडीसीतील विप्रो एंटरप्रायझेस प्रा. लि. कंपनी…


  • दुचाकी चोराला अटक; तब्बल १४ मोटारसायकली जप्त!

    दुचाकी चोराला अटक; तब्बल १४ मोटारसायकली जप्त!

    Share       Total Views: 7छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; विशेष पोलीस पथकाची मोठी कामगिरी! न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज, छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक परिसरासह छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई…



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *