July 29, 2026
Screenshot_20260729_182512_Gallery

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर

बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी रोड परिसरातील एका पानटपरीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सिगारेटचा मोठा साठा व रोख रक्कम असा ₹२ लाख ३३ हजार ७०० किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बिबिषण काळे (वय ३६, रा. सिडको महानगर-१, तिसगाव) यांचे लोकमान्य चौक येथे गणेश पान शॉप आहे. २५ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. २६ जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप व कडी-कोंडा तुटलेला दिसून आला. अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून फोर स्क्वेअर, एम अॅडव्हान्स, फ्युज बँड, शिप्ट बटन व क्लो मिक्स कंपनीच्या सिगारेटची एकूण १,१०० पाकिटे तसेच ₹३५ हजारांची रोख रक्कम असा एकूण ₹२,३३,७०० किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उगले करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!