
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी” या नावाने चर्चेत आलेले अभिजीत दिपके यांना धमकीचा मेसेज आल्याच्या प्रकरणानंतर आता पोलिस प्रशासन सतर्क झाले असून त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील आई-वडिलांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून दिपके यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “अकाउंट डिलीट करून सर्व प्रकार थांबव, अन्यथा तू अमेरिकेत असलास तरी तुझे आई-वडील भारतात आहेत,” असा धमकीचा संदेश अभिजीत दिपके यांना मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणानंतर सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले होते. विविध स्तरातून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिपके यांच्या आई-वडिलांच्या घरासमोर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
- (no title)
- (no title)
