
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर : सिडको तिसगाव शिवार परिसरात महावितरणच्या उपकेंद्राचे बांधकाम सुरू असून या कामासाठी ठेवण्यात आलेले तब्बल ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचे ६६ वीज खांब अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज खांब चोरी झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैक्सन कंपनीचे असिस्टंट मॅनेजर अमित कुमार सिंह वकील सिंह (वय ३३, रा. सातारा परिसर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. बेलथा, जि. बलिया, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, कंपनीकडून उपकेंद्राच्या बांधकामासाठी ठेवण्यात आलेले वीज खांब व तार ३० एप्रिल रोजी व्यवस्थित होते. तसेच साहित्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही नियुक्त करण्यात आला होता. मात्र २० मे रोजी सकाळी अमित सिंह हे नेहमीप्रमाणे घटनास्थळी गेले असता, साहित्याची मोजणी करताना ११ मीटर लांबीचे ४४ खांब आणि १२ मीटर लांबीचे १२ खांब जागेवर नसल्याचे आढळून आले.
यानंतर परिसरात शोध घेण्यात आला तसेच सुपरवायझर गंगासागर आणि राकेश प्रजापती यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र खांबांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर अज्ञात आरोपींनी ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचे एकूण ६६ वीज खांब चोरी केल्याचे समोर आले.
या प्रकरणी अमित सिंह यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय जगताप पुढील तपास करत आहेत.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
