अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या; उद्योगवाढीसाठी प्रशासन कटिबद्ध – जी. श्रीकांत

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक परिसरातील गट नंबरमधील उद्योगांच्या गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी मसिआ कार्यालयात प्रशासन आणि उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ)च्या वाळूज येथील कार्यालयात आयोजित या बैठकीत विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, CSMRDA चे अधिकारी तसेच मसिआचे अध्यक्ष गजानन देशमुख उपस्थित होते.
बैठकीत मसिआचे सचिव राजेश मानधनी यांनी औद्योगिक क्षेत्रालगत विविध ग्रामपंचायतींतील गट नंबरमध्ये अनेक उद्योग कार्यरत असून त्यांना आकृषिक गुंठेवारी नियमितीकरणासाठी मसिआ सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. शासनाने अभय योजनेच्या माध्यमातून दिलेला दिलासा उद्योजकांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अध्यक्ष गजानन देशमुख यांनी गट नंबरमधील उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि नागरिकांना गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचा आढावा मांडला. मसिआच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 24 एप्रिल 2026 रोजी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जमीन वापर बदल आणि बेटरमेंट चार्जेस संदर्भात अभय योजना राबविण्याबाबत परिपत्रक काढल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. तसेच जास्तीत जास्त उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

माननीय जी. श्रीकांत यांनी प्रशासन सर्व विभागांच्या समन्वयातून प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. उद्योगांना कमीत कमी त्रास होऊन त्यांना न्याय मिळावा आणि उद्योगवाढीस पूरक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अभय योजनेतून जमा होणारा निधी परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, सॉलिड वेस्ट व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सह आयुक्त अंजली धानोरकर, सह महानगर नियोजनकार रवींद्र जयभाये, लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर, उप महानगर नियोजनकार अक्षय ठेंग, सौरभ रांका तसेच सहाय्यक महानगर नियोजनकार देवानंद जाधव यांनीही संबंधित प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
उपाध्यक्ष राहुल मोगले यांनी आभार प्रदर्शन करताना गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी मसिआ पुढील काळातही उद्योग आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
बैठकीस मसिआचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि गट नंबरमधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
सिडको तिसगाव शिवारातून ४ लाख ४९ हजारांचे ६६ वीज खांब चोरी

Share Total Views: 2 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर : सिडको तिसगाव शिवार परिसरात
-
“गुंठेवारी नियमितीकरणाला वेग; मसिआच्या बैठकीत प्रशासन-उद्योजकांमध्ये सकारात्मक चर्चा”

Share Total Views: 261 अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या; उद्योगवाढीसाठी प्रशासन कटिबद्ध – जी.
-
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांना मुलाची चिंता; “राजकारणापासून दूर राहून नोकरी करावी”

Share Total Views: 10 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडेChhatrapati Sambhajinagar : देशभरात चर्चेचा विषय
