
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने नीट परीक्षेमधील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ सोमवारी क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे…विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा निषेध असो… अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
नीट परीक्षेतील गैरप्रकार हा केंद्र सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात मोठे मंत्री, खासदार आणि केंद्रातील काही अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केलेले आरोपी हे केवळ मोहरे असून मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
तसेच, या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे,युवासेना विभागीय सचिव ॲड धर्मराज दानवे,जिल्हाधिकारी हनुमान शिंदे,महाविद्यालय कक्षप्रमुख अभिजीत थोरात,शहरधिकारी अजय चोपडे,स्वप्नील डिडोरे,उपशहरधिकारी हरिष पाटील, देविदास खरात,प्रसाद पानपट,देवेंद्र गायकवाड,सुमेद गायकवाड,राघव दानवे,हेमंत जाजू, वेद लोहिया,उदयराज दानवे, मयुर गादे, रोहित गायकवाड, गंगाराम कुटे,हर्षल गवळी,आयुष पाटील,निखिल दानवे,अनिकेत गजभर,स्वराज ठोंबरे मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
