
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर : एमआयडीसी वाळूज औद्योगिक परिसरातील ऑटोमेंट इंडस्ट्रीज कंपनीत पहाटेच्या सुमारास घुसून वॉचमनला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून लाखो रुपयांचे कॉपर साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ३ लाख रुपयांचे कॉपर साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी फिर्यादी संजय माणिकराव कुलकर्णी (रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. २१ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यान डी-१४, एमआयडीसी परिसरातील त्यांच्या कंपनीत चार चोरट्यांनी कंपाउंडवरून उडी मारून प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी कंपनीतील वॉचमनला मारहाण करत त्याचे हातपाय बांधले आणि कंपनीतील कॉपर साहित्य लंपास केले. या चोरीत तब्बल ४ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी विशेष पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान सराईत आरोपी करण अशोक कांबळे याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार दीपक राजू थूने, प्रशांत निकाळजे आणि प्रतीक केदारे यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी करण कांबळे आणि दीपक थूने या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोउनि सागर पाटील संजय जगताप, बाबासाहेब काकडे, नितीन इनामे, समाधान पाटील, वैभव गायकवाड, रोहित चिंधळे, हनुमान ठोके, अविनाश ढगे, राजाराम वाघ, प्रकाश वाघ, सुरज अग्रवाल व छाया दहिजे यांनी केली.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
