
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा –
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील एका 32 वर्षीय महिलेची बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने तब्बल 3 लाख 75 हजार 939 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिलेच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने स्वतःला आयसीआयसीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिच्या क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती दिली. त्यानंतर ‘सेवा अॅक्टिव्हेट करण्यासाठी’ ओटीपी आवश्यक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. महिलेने ओटीपी शेअर करताच काही वेळातच तिच्या खात्यातून दोन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 3,75,939.78 रुपये काढण्यात आले.
घटनेनंतर महिलेने संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद लागला. त्यानंतर तिने तात्काळ बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक केले. मात्र तोपर्यंत मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
