
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसर रविवारी (दि. २६) हादरला, कारण एकाच दिवशी तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या. मृतांमध्ये दोन तरुण आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश असून, या सलग घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना सकाळी दहा वाजता राजानगाव शेणपूंजी येथे उघडकीस आली. पवन रावसाहेब वनारसे (वय २१, रा. फतेहपूर, ता. भोकरदन, जि. जालना) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसरी घटना सायंकाळी सहाच्या सुमारास दत्तनगर, राजानगाव शेणपूंजी येथे घडली. विजय दत्ताराव पाटील (वय अंदाजे ५५) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तिसरी घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बजाजनगर येथील जय विजय हाउसिंग सोसायटीत उघडकीस आली. किरण धोते (वय २२) या तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तिन्ही प्रकरणांची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे वाळूज महानगरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
….
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


