साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : वाळूज MIDC परिसरातील इंड्युरन्स कंपनीतून मालचोरी करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. MIDC वाळूज पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ४ लाख ६८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी योगेश रामदास साबळे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १८ डिसेंबर रोजी कंपनीचा माल बोलेरो वाहनातून कृष्णा कोटिंग कंपनीकडे पाठविण्यात आला होता. मात्र आरोपींनी संगनमत करून मालातील काही हिस्सा लंपास करत स्वतःच्या फायद्यासाठी विक्री केल्याचे उघड झाले.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना विशेष पथकातील पोलीस अंमलदार सुरेश भिसे यांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप रमेश दाणे, निलेश संजय पवार आणि राजू सलाउद्दीन शेख यांचा समावेश आहे. आरोपींनी चोरीचा माल विक्रीस काढल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ४५० किलो वजनाचे Aluminium Ingot चे ४५ लॉट, किंमत १ लाख ६८ हजार ७५० रुपये, तसेच इतर ३ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. एकूण जप्तीची रक्कम ४ लाख ६८ हजार ७५० रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान, या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद अबूज करीत आहेत. MIDC वाळूज पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
