
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर १ मधील सार्वजनिक सभागृहाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. एकेकाळी सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे केंद्र असलेले हे सभागृह आज अक्षरशः ओसाड, मोडकळीस आलेले खंडहर बनले आहे.
पूर्वी सिडको प्रशासनाकडून नागरिकांना सशुल्क उपलब्ध करून दिले जाणारे हे सभागृह परिसरासाठी मोठी सोय ठरत होते. मात्र गेल्या काही वर्षांत साफसफाई, देखभाल आणि दुरुस्ती पूर्णपणे थांबल्याने या इमारतीची अवस्था दिवसेंदिवस बिकट झाली. सध्या येथे कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुर्लक्षित अवस्थेमुळे या ठिकाणी नशेखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून महिलांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियमित कर भरणाऱ्या नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेकडे सिडको प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार अर्ज, निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला आहे.
शिवसेना उपशहर प्रमुख तथा पंचायत समिती गटनेते दत्तात्रय भामाबाई भासंकरराव वपे यांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ सभागृहाची दुरुस्ती करून ते अद्ययावत सुविधांनी सुसज्ज करावे, अशी मागणी केली आहे.
मागणी तातडीने पूर्ण न झाल्यास “जनआक्रोश आंदोलन” छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, वाळूजमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
