9 गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर (वाळुज) : वाळुज परिसरात घरफोडी व वाहन चोरी करून पोलिसांना वारंवार चकवा देणाऱ्या सराईत आरोपीला अखेर अटक करण्यात वाळुज पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल 9 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून सुमारे 3 लाख 7 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 72/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(3), 331(4) अन्वये दाखल घरफोडी चोरी प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे हे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. तपासादरम्यान डोमेगाव येथील राहुल कांताराज पवार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाने मिरजगाव, जामखेड (जि. अहिल्यानगर) तसेच इंदापूर (जि. पुणे) या भागात शोधमोहीम राबवली. मात्र आरोपी वारंवार ठिकाण बदलत पोलिसांना चकवा देत होता. अखेर 25 मार्च 2026 रोजी इंदापूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चांदीचे दागिने, साड्या, विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या 3 मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान खालील गुन्हे उघडकीस आले –
वाळुज पोलीस ठाणे – गुन्हा क्र. 12/2026, 51/2026
अंभोरा (जि. बीड) – गुन्हा क्र. 240/2025
वालचंदनगर (जि. पुणे) – गुन्हा क्र. 89/2026, 99/2026, 275/2025
नेवासा (जि. अहिल्यानगर) – गुन्हा क्र. 215/2026
शहापूर, इचलकरंजी (जि. कोल्हापूर) – गुन्हा क्र. 57/2026
अशा एकूण 9 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्यासह विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, सुखदेव भागडे, दशरथ खोसरे तसेच पोलीस मित्र अमन शेख व किशोर गाडेकर यांनी मोलाची भूमिका बजावली.
या धडाकेबाज कारवाईमुळे वाळुज परिसरातील घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
