Screenshot
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील रामपरी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतांमधील विजेच्या वाहक तारा चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित झाला असून पिकांना पाणी देण्यास गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मंगळवारी सकाळी ही घटना समोर आली असून याप्रकरणी महावितरणच्या तुकाबाद शाखेचे कनिष्ठ अभियंता शेख मुफीद मकसूद अहमद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपरी शिवारातील गट क्रमांक २१ व ३२ मधील सांडू भिमाजी प्रधान, सखाराम राधाकिसन बरबरड आणि कारभारी आसाराम बनकर यांच्या शेतातून विजेच्या वाहक तारा चोरी करण्यात आल्या. चोरट्यांनी सुमारे 24 हजार 328 रुपयांच्या तारांवर डल्ला मारला आहे.
विशेष म्हणजे, या परिसरात यापूर्वीही विजेच्या तारांच्या चोरीच्या घटना घडल्या असून, वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विजेचा पुरवठा खंडित झाल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेती धोक्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ नवीन तारा बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार उगले हे करत आहेत.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
