
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौक येथे भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचारीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी मीराबाई लक्ष्मण जाधव (वय 45, रा. भंडारवाडी, ता. रेणापुर, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांचे पती लक्ष्मण गोपीनाथ जाधव हे कामगार चौक ते पेंटर चौक दरम्यान पायी जात असताना अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात येऊन त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले.
धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
-
फक्त ५०० रुपयांसाठी खून? “टपका रे टपका” रिलमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
-
गोरखनाथ नामदेव कडू यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
-
किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात राडा; परस्पर विरोधी तक्रार दाखल, बकवालनगर येथील घटना
