Screenshot

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर (सिल्लोड) : जुन्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत, त्या काळाच्या ओघात कुठेतरी दडून राहतात. वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी सिल्लोड येथील एका तरुणाने तब्बल १७ वर्षांपूर्वी विकली गेलेली वडिलांची बुलेट शोधून पुन्हा घरी आणण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. राहुल सोनवणे असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या जिद्दीची आणि पितृप्रेमाची सध्या शहरभर चर्चा होत आहे.
सिल्लोड येथील कै. नंदकुमार सोनवणे यांनी सन २००० मध्ये मोठ्या हौसेने बुलेट मोटारसायकल (क्र. MH-20 AJ 6495) खरेदी केली होती. मात्र काही दिवसांतच झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराचा आधारवड गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले. त्यावेळी मुले लहान असल्याने आणि आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने त्यांच्या पत्नी अल्काबाई सोनवणे यांनी जड अंतःकरणाने ही बुलेट सुमारे ३४ हजार रुपयांना विकावी लागली.
वडिलांची पहिली गाडी घरातून जाताना पाहून लहानग्या राहुलच्या मनात ती आठवण कायमची कोरली गेली. काळानुसार राहुल मोठा झाला आणि सिल्लोडमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. मात्र वडिलांची ती बुलेट पुन्हा मिळवण्याची त्याची इच्छा कायम होती.
या जिद्दीने राहुलने मित्रांच्या मदतीने आणि सोशल मीडियाचा वापर करून त्या गाडीचा शोध सुरू केला. तब्बल १७ वर्षांनंतरही त्याने जुने रेकॉर्ड्स तपासले. अखेर अनेक प्रयत्नांनंतर गाडी कोणाकडे आहे याचा मागोवा लागला. दरम्यान ही बुलेट सहा जणांच्या हातातून फिरली होती.
राहुलने त्या व्यक्तीशी संपर्क साधून गाडी विकण्याची विनंती केली. सुरुवातीला समोरच्या व्यक्तीने गाडी विकण्यास नकार दिला. मात्र राहुलने त्या गाडीशी जोडलेले भावनिक नाते सांगितल्यावर व्यवहार निश्चित झाला. अखेर राहुलने ती बुलेट तब्बल २ लाख ५० हजार रुपयांना पुन्हा विकत घेतली.
१७ वर्षांनंतर वडिलांची बुलेट पुन्हा घराच्या अंगणात उभी राहिल्याने संपूर्ण सोनवणे कुटुंब भावूक झाले. ज्या आईने परिस्थितीमुळे ही गाडी विकली होती, त्याच आईच्या हस्ते राहुलने या बुलेटचे विधीवत पूजन केले.
“ही केवळ लोखंडाची गाडी नसून माझ्या वडिलांचा स्पर्श आणि आशीर्वाद आहे. आज ती घरात आली तेव्हा वडिलांचे अस्तित्व पुन्हा जाणवले.”
— राहुल सोनवणे, युवा उद्योजक, सिल्लोड
“राहुलची ही जिद्द खरंच प्रेरणादायी आहे. १७ वर्षांपूर्वीची एक आठवण त्याने इतक्या चिकाटीने जपली आणि अखेर पूर्णही केली. आम्ही मित्र म्हणून फक्त साथ दिली, पण त्याने दाखवलेलं पितृप्रेम आणि भावनिक जुळलेपण प्रत्येकासाठी शिकण्यासारखं आहे.”
— राहुलचा मित्र :- नारायण राजपूत
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
