अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभाग यांची कारवाई

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर राज्यात अवैध ड्रग्स विक्री, वितरण वाहतुक तसेच तस्करी यांचेवर कठोर कारवाई करता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, भा.पो.से या नमुद टास्क फोर्सच्या प्रमुख असुन त्यांच्या नियत्रंणाखाली छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना, धाराशिव या कार्यक्षेत्राकरीता छत्रपती संभाजीनगर कृती विभाग कार्यरत आहे.
दिनांक 16/03/2026 रोजी प्राप्त गोपनीय माहिती नुसार पोलीस स्टेशन एम. सिडको, छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीत दोन इसम एम.डी. सारखे अंमली पदार्थ तयार करत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक श्री अजीत टिके यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप अधिक्षक श्री साईनाथ ठोंबरे यांचे नेतृत्वाखाली पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शहानगर मसनतपुर या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून किंमत रुपये 3,95,780 किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये एम.डी ड्रग्स 65 ग्रॅम, Distilation process करीता वापरले जाणारे साहित्य राऊंड बॉटम फ्लास्क, कंडेनसर, लेबल काढलेले लिक्वीड केमीकलचे 12 बॉटल्स, सॉलीड केमीकल पावडर 3 छोटे बॉक्स, मिक्सर मशीन, प्लास्टिक ड्रम, कॅन, 3 मोबाईल फोन असा मुद्देमाल आरोपी नामे 1) रोशन रविंद्र कदम वय 32 वर्ष व्यवसाय व्यापार, रा. कोपरी, आनंदनगर, शिवसेना शाखेच्या मागे, ओम कांगुरी मित्र मंडळ, ठाणे इस्ट 2) मयुर दिपक जाधव वय 23 वर्ष व्यवसाय चालक, रा. कोपरी आनंदनगर नवजीवन मित्रमंडळ, ठाणे यांचे ताब्यातुन पंचनाम्याने जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे एम. सिडको येथे गुरन 148/2026 NDPS कायदा कलम 8(C), 21,22(C), 25(A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी अटकेत आहे. यातील आरोपी क्रमांक 01 हा रसायन शास्त्राचे शिक्षण घेतलेले असुन गुन्हयाचा अधिक तपास छत्रपती संभाजीनगर कृती विभाग कार्यालयाकडुन सुरु आहे.
नमूद कारवाई मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, मा. पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस अधिक्षक श्री अजित टिके, मा. पोलीस उप अधिक्षक श्री साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सपोनि विजय जगदाळे, सपोनि दिपाली पाटील, सफौ शिंदे, पोह जाधव, साळवे, गाडेकर, आगीवाले, पाटील, पोअं/ मुंढे, तुपे, जोनवाल, चव्हाण, ठाकुर, काळे, शेलार मपोअं/ कितीकर, सुर्यवंशी, पवार, सर्व नेमणुक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, (कृती) छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना, धाराशिव या कार्यक्षेत्रामध्ये कोणीही इसम हा अंमली पदार्थाची तस्करी, विक्री, वाहतुक, लागवड करीत असेल याबाबत त्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, (कृती) छत्रपती संभाजीनगर विभाग यांना कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे अवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
