
वाळूज महानगर : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका युवकाने अमरावती (विदर्भ) येथील विवाहित महिलेची फसवणूक करून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत संबंध ठेवले असून सध्या पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. मात्र आता आरोपीने लग्नास नकार देत गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अमरावती येथील पीडित महिलेने राजनगाव (ता. गंगापूर) येथील रेहान मोहम्मद शेख याच्याविरुद्ध अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पुढील तपासासाठी हा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पतीपासून विभक्त
सुमारे ३० वर्षीय पीडित महिलेचा पूर्वी विवाह झाला असून तिला ८ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. पती दारूच्या व्यसनाधीन असल्याने ती पतीपासून विभक्त होऊन अमरावती येथे आईकडे मुलांसह राहत आहे.
इंस्टाग्रामवरून झाली ओळख
एप्रिल २०२५ मध्ये पीडित महिला आणि राजनगाव येथील आरोपी रेहान मोहम्मद शेख यांची इंस्टाग्रामवरून ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत संपर्क वाढवला आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत १९ मे २०२५ रोजी पीडितेला अमरावतीहून छत्रपती संभाजीनगर येथे बोलावले. तेथून तिला राजनगाव येथे नेऊन दोन दिवस तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपी अमरावतीला जाऊन तिच्या आईच्या घरीही गेला आणि तेथेही तिच्याशी संबंध ठेवले, असे तक्रारीत नमूद आहे.
साडेपाच महिन्यांची गर्भवती
सध्या पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. तिने आरोपीकडे लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपीने गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. तसेच गर्भपात केला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
अमरावती पोलिसांत गुन्हा दाखल
धमक्यांमुळे घाबरलेल्या पीडित महिलेने अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे पाठवले. त्यानंतर पीडित महिलेने सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांची भेट घेऊन संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


