
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासादरम्यान हत्येचा थरारक उलगडा झाला आहे.
मृत प्राध्यापकाचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विभागप्रमुख होते. प्राथमिक माहितीनुसार, लोंढे आणि आरोपींमध्ये सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. पैशांच्या वादातून आरोपींनी लोंढे यांच्याच पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह गेवराई तांड्याजवळ खड्डा खोदून पुरला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे.
तपासादरम्यान आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विविध बनाव रचल्याचेही उघड झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
-
आईला मारहाण केल्याच्या रागातून तरुणाचा खून; अवघ्या दोन तासांत पोलिसांनी केले पाच आरोपी अटक…
-
“या” कारणामुळे अंबेलोहळमध्ये तरुणाचा मरेपर्यंत बेदम मारहाण करून संपवल…
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
