कायगाव येथील इसमाचा जागीच मृत्यू, भेंडाळा गावाजवळ अपघात

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
गंगापूर (प्रतिनिधी):
छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर भेंडाळा गावाजवळ रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्याला भरधाव अज्ञात मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने नवीन कायगाव (ता. गंगापूर) येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भेंडाळा येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणारे कृष्णा रामभाऊ राऊत (वय ४८, रा. नवीन कायगाव ता. गंगापूर) हे सकाळी रस्ता ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरवरून अहिल्यानगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात राऊत गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर स्थानिक नागरिक तसेच रुग्णवाहिका चालक सागर शेजुळ व मंगेश खाजेकर यांनी जखमींना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राऊत यांना तपासून मृत घोषित केले.
मृत कृष्णा राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजयी तसेच पुतणे-पुतण्या असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून दुपारी जुने कायगाव येथील रामेश्वर मंदिर परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
