
उपळी / प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह एका संस्थेच्या ताब्यात असल्याचा प्रकार समोर आला होता. संबंधित संस्थेला अनेक वेळा सूचना व नोटीस देऊनही सभागृह खाली करण्यात आले नसल्याने ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घेत शनिवार (दि. ७) रोजी सामाजिक सभागृह सील करून ते पुन्हा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेतले.
ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्ता सर्वसामान्य ग्रामस्थांच्या उपयोगासाठी उपलब्ध व्हावी आणि तिचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.
या कारवाईवेळी ग्रामसेवक प्रभाकर दहीहंडे, तलाठी प्राप्ती चांगाडे, पोलीस पाटील आबाराव जाधव, सरपंच पर्वताबाई दुधे, उपसरपंच माधुरी समाधान गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सदस्य प्रदीप शेजुळ, भगवान अहिरे, वंदना कल्याण शेजुळ, मनीषा पांढरे, रामदास दुधे, समाधान गायकवाड, ऋषिकेश शेजुळ, रामराव फोलाने, राम कोटीये, राधा ढवळे, प्रभाकर शेजुळ, विठ्ठल गायकवाड, बाजीराव औटे, प्रवीण शेजुळ, योगेश फोलाने, नारायण शेजुळ, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


