गंगापूर तालुक्यात ट्रॅक्टर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत
सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर हस्तगत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी, दोन आरोपी फरार

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : गोकुळ लांडे
गंगापूर प्रतिनिधी : पोलीस ठाणे गंगापूर येथे दाखल झालेल्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा करत चोरीस गेलेले सोनालिका कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (MH-57 / 1489) हस्तगत केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
(PCR) सुनावली आहे.
फिर्यादी आरिफ नजीर शेख (वय २५, रा. शिंगी, ता. गंगापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिंगी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाखरे व पोलीस अंमलदार अनिरुद्ध शिंदे यांनी केला. तपासादरम्यान वाहेगाव, गाडे पिंपळगाव व मुद्देश वाडगाव येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये चोरीचे ट्रॅक्टर पांढऱ्या रंगाच्या कारच्या उजेडात बाजाठाणकडे नेत असल्याचे दिसून आले.
पुढील तपासात सदर ट्रॅक्टर कमलपूर (ता. श्रीरामपूर) येथील महानुभव पंथ मंदिराजवळ उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, ट्रॅक्टर विक्रीच्या उद्देशाने नेत असलेले दोन संशयित आढळून आले. चौकशीत त्यांनी मौजे शिंगी (ता. गंगापूर) येथून दोन साथीदारांसह ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —
अभिजित बाळासाहेब सर्वयंशी , गौतम पुंजाहारी गायकवाड
(दोन्ही रा. बाजाठाण, ता. वैजापूर) दोन्ही आरोपींसह चोरीचे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पालवे तसेच पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
