
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:
छत्रपती संभाजीनगर : शेतातील बंद घर फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. या कारवाईत सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी सत्यवान एकनाथ मिसाळ (रा. मांजरी शिवार, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्ह दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्यांनी शेतातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून ५५ हजार रुपये रोख रक्कम व सोन्याची नथ चोरून नेली होती.
गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी, संशयितांची चौकशी तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात आले.
दि. १ मार्च २०२६ रोजी खात्रीशीर माहितीच्या आधारे भेंडाळा ते गंगापूर रस्त्यावर सापळा रचण्यात आला. संशयित दऱ्या बरांड्या भोसले (वय ३५, रा. अंतापूर शिवार, ता. गंगापूर) हा मोटारसायकलवर येताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली.
दोन पंचांसमक्ष केलेल्या अंगझडतीत त्याच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. ग्रामीण भागातील घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
