
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर प्रतिनिधी : बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शैक्षणिक व संशोधन क्षमतेची ठोस छाप उमटवत मानाचा तुरा मिळवला आहे. दि. ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान Indian Institute of Technology Jammu येथे आयोजित “जलविज्ञान, दूरसंवेदन व हवामान बदलातील अलीकडील प्रवाह व प्रगती” या द्वितीय आंतरराष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनी संशोधनपर शोधनिबंध प्रभावीपणे सादर केले.
या परिषदेत प्रा. डॉ. प्रदीप भलगे, विभागप्रमुख प्रा. रियाजुद्दीन सिद्दीकी, प्रा. कल्याणी कोंडेकर, प्रा. ऋषिकेश आहेर, प्रा. कैलास चरखा, प्रा. मोहम्मद अफिफुद्दीन आणि प्रा. डॉ. लक्ष्मण मिश्रा यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांमध्ये जलसंपदा व्यवस्थापन, हवामान बदलाचा परिणाम तसेच दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला.
परिषदेदरम्यान देश-विदेशातील संशोधक व तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्राध्यापकांनी आत्मविश्वासाने आणि समाधानकारक उत्तरे देत आपल्या ज्ञानाची व संशोधनक्षमतेची उत्कृष्ट छाप पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व प्राध्यापकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, “सर्वोत्तम तोंडी सादरीकरण” हा पुरस्कारही सहभागी प्राध्यापकांना प्राप्त झाला. याशिवाय, हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाला उत्कृष्ट शैक्षणिक योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा “उत्कृष्ट योगदान” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रा. सुनील कुमार यांच्या हस्ते देण्यात आला.
या यशाबद्दल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव मा. श्री. एकनाथराव जाधव व सहसचिव मा. श्री. अमन जाधव यांनी सहभागी प्राध्यापकांचे कौतुक करून भविष्यातही संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आवाहन केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, विविध विभागप्रमुख तसेच सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशामुळे बजाजनगरसह वाळूज परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
