
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : गोकुळ लांडे
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील कायगाव परिसरात शुक्रवारी (ता.२७) सकाळी दहाच्या सुमारास हृदयद्रावक अपघात घडला. अमळनेर जोशी फाटा येथे अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेत मृत मुलाचे नाव विशाल अंकुश पवार (वय ६, रा. पोळ रांजणगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
परतीच्या प्रवासात काळाचा घाला
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखमापूर शिवारात ऊसतोडणीसाठी आलेले कामगार हंगाम संपल्याने आपल्या गावी परतत होते. त्यावेळी एक कुटुंब आई-वडील आणि लहान मुलांसह पायी जात असताना पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत विशाल पवार हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला. आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू झाल्याने आईने घटनास्थळी हंबरडा फोडला. ही घटना पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले.
नागरिकांची धाव, उपजिल्हा रुग्णालयात दाखल
घटनेनंतर स्थानिक नागरिक व प्रवाशांनी तत्काळ मदत करत मुलाला गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल ढाबे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास कायगाव बिटचे पोलीस नाईक व्ही.बी. जाधव करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
