
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर | प्रतिनिधी
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी (गट क्रमांक 8) येथे घडली. गुन्हा 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.01 वाजता नोंदविण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलीच्या घरी आरोपी पवण प्रल्हाद खरात (रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर), सागर सिताराम बनकर (रा. आबेगाव, ता. गंगापूर) व रामेश्वर वाघमारे (रा. वडगाव कोल्हाटी) हे तिघे गेले होते. यावेळी रामेश्वर वाघमारे याने फिर्यादीच्या हातातील मोबाईल काढून तो पवण खरात याच्याकडे दिला. त्यानंतर पवण खरात याने फिर्यादीस पाठीमागून मिठी मारून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सागर बनकर याने फिर्यादीच्या आईस शिवीगाळ करून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी (POCSO) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शेवाळे करीत असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
