
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर | प्रतिनिधी
श्री माहेश्वरी मंडल, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत वाळूज प्रभागाची सन २०२६–२९ या कार्यकाळासाठीची कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. समाजातील सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे नवीन नेतृत्वावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून, समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवडीत अध्यक्षपदी संतोष राठी, सचिवपदी कमल काबरा, उपाध्यक्षपदी उज्वला भक्कड तर कोषाध्यक्षपदी विजय सारडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मंडळामार्फत आयोजित होणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व सेवा उपक्रमांमध्ये तन्मयतेने सहभाग घेत समाजसेवेसाठी कार्यकारिणीची संपूर्ण ताकद समर्पित करण्याची भूमिका जाहीर केली.

मंडळ व समाज यांच्यात सुसंवाद व सुव्यवस्थापन राखत संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सहकार्य पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त झाला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत सचीन करवा, कैलास मुंदडा, विजय जाजू, गणेश राठी, रजत सोनी, ललित बग, नंदकिशोर काबरा, दिलीप भंसाली, ब्रिजेश मोदानी, सत्यनारायण मुंदडा, मनीष मुंदडा, दिनेश राठी, रचना मालपाणी, श्रीनिवास सोनी, प्रीतेश राठी, आशिष राठी, योगेश मिनियार, श्यामसुंदर मिनियार आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळात मंडळाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
