वाळूजच्या वैद्यकीय पथकाची धावः आई व बाळ सुरक्षित

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : आयुष्याचा प्रवास अक्षरशः रस्त्यावर असताना एका आईच्या वेदनांनी बस थांबवली आणि काही क्षणांतच त्या बसमध्ये नवजीवनाचा किलबिलाट दुमदुमला. मंगळवारी (२४) सकाळी वाळूज येथे घडलेली ही घटना संवेदनशीलता, प्रसंगावधान आणि मानवी ममत्वाचा प्रत्यय देणारी ठरली.

जळगाव जिल्ह्यातील बोधरे (ता. चाळीसगाव) येथील गोरख गायकवाड हे पत्नी ज्योती व मुलांसह ऊसतोडीचे आटोपून गावी परतत होते. दिवस भरलले असतानाही परिस्थितीमुळे प्रवास अपरिहार्य होता. पहाटेची बस, थकलेले डोळे आणि मनात घरी सुखरूप पोहोचण्याची आस. या सकाळी सुमारे ८.५० वाजता वाळूज येथे पोहोचताच ज्योती यांच्या वेदना असह्य झाल्या. क्षणभर सगळेच गोंधळले; परंतु चालक एस. एम. माळी आणि वाहक ए.एस. अंभोरे यांनी धीर सोडला नाही. प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात सुरक्षित उतरवून त्यांनी बस थेट वाळूज रुग्णवाहिकेला उशिरा होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ‘आता वेळ घालवायची नाही’ असा निर्णय घेत आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते आणि परिचारिका उषा गायकवाड यांनी ही क्षणाचा विलंब न लावता बसमध्येच प्रसूती करण्याचे ठरवले. बाहेर उन्हाची झळ, आत वेदनांनी
तडफडणारी आई आणि डॉक्टरांचे स्थिर हात, परिचारिकांचे आश्वासक शब्द, काही मिनिटांच्या संघर्षानंतर बसमध्येच गोंडस बाळाचा पहिला रडका आवाज घुमला आणि वातावरणात सुटकेचा निःश्वास पसरला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचे समजताच उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पुढील उपचारासाठी दोघांनाही आरोग्य केंद्रात हलवण्यात आले असून प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
