
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी १०.१० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रपतींच्या आगमनामुळे विमानतळ परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राष्ट्रपतींचे स्वागत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर, खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी प्रशासनातर्फे विशेष तयारी करण्यात आली होती. विमानतळ परिसरात सुरक्षा यंत्रणांनी दक्षता घेतली होती. स्वागत समारंभानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
