Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर (प्रतिनिधी) : धुळे–सोलापूर हायवे रोडवर तणवाणी इंग्रजी शाळेजवळ भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याची घटना 21 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता घडली. या अपघातात 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विशाल बारकुसिंग महेर (वय 22, रा. बेंदवाडी परसोडा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कार (MH12JC2326) ने परसोडा–लासूर स्टेशन–करोडी पूल–करोडी फाटा मार्गे घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे जात होते.
दरम्यान, तणवाणी इंग्रजी शाळेजवळ अचानक भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (MH20EG5375) ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात महेर यांच्या नाक, छाती व डाव्या पायाच्या गुडघ्यास गंभीर दुखापत झाली असून कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.39 वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
