
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा –
छत्रपती सांभाजीनगर : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) केंद्रास आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आज इयत्ता १२ वीचा अर्थशास्त्र या विषयाचा पेपर होता.
सिडको येथील पद्मश्री वसंतदादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, चिकलठाणा या दोन परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी परीक्षा संचालनाची संपूर्ण प्रक्रिया, परीक्षा दालनातील शिस्त, आसनव्यवस्था, गोपनीयता आणि पारदर्शकता यांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रांवर कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा, त्याची स्टोरेज व्यवस्था तसेच नियंत्रण प्रणालीची तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना पुरेसा उजेड, हवा व पिण्याचे पाणी याची व्यवस्था उपलब्धता याबाबत पाहणी केली. उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी असलेले शांतता व एकाग्रतेचे वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


