Screenshot
वाळुज महानगर/ न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेल्या मोपेडच्या धडकेत एक महिला जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मी प्रविण दुबिले (वय 31, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) या दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास गल्लीतील किराणा दुकानातून सामान घेऊन पायी घरी परतत होत्या. त्या घरासमोर येत असताना मिरा मच्छिंद्र घोगरे (रा. गणेश नगर, जोगेश्वरी) हिने ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर मोपेड भरधाव वेगाने चालवित पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेत फिर्यादी खाली पडून जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी महिलेला उपचारासाठी हलविण्यात आले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल वाघ करीत आहेत.
