
वाळूज महानगर : न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) :
इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक) परीक्षेला आज सोमवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून आज पहिला इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला. वाळूज परिसरात शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
वाळूज परिसरात एकूण ९ परीक्षा केंद्रे असून यामध्ये बाजाजनगर येथे ४, रांजणगाव शेणपूंजी येथे ३, वाळूज येथे १, अंबेलोहळ येथे १ आणि शहापूर बंजार येथे १ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर एकूण ४२२३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
या परीक्षा केंद्रांवर राजा शिवाजी ज्युनियर कॉलेज, तनवणी ज्युनियर कॉलेज, ऑर्किड ज्युनियर कॉलेज, ज्ञानभवन महाविद्यालय, राजश्री शाहू ज्युनियर कॉलेज, भगतसिंग ज्युनियर कॉलेज, शंकरराव पाटील ज्युनियर कॉलेज, डिफेन्स करिअर अकॅडमी तसेच राजे शहाजी ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी २.१० वाजेपर्यंत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्धा तासाची अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मुख्य केंद्र संचालक म्हणून लक्ष्मण जावळे, डी. के. दाणेकर, स्वप्नील शेळके, शरद कांडुरे, अर्चना जाधव, जयश्री शेजूळ, शरद जोशी, शुभम राईतकर व इस्माईल शेख हे जबाबदारी पार पाडत आहेत.
सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. सुरुवातीचा इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

