
वाळूज | प्रतिनिधी
“फक्त पाहत होतो, फायर कसा झाला कळलंच नाही!” अशी कबुली देणाऱ्या एका इसमामुळे वाळूज परिसरात थरार उडाला. बेकायदेशीर गावठी पिस्तूल हाताळताना चुकून गोळी सुटून मित्राच्या पायात घुसल्याची घटना शिवराई फाटा परिसरात घडली असून वाळूज पोलिसांनी आरोपी अझहर शफी सय्यद याला अटक केली आहे.
६ फेब्रुवारीच्या रात्री सपना हॉटेल शेजारी मोकळ्या जागेत बसून पिस्तूल “नुसतं बघत” असतानाच अझहरकडून गोळी फायर झाली. ही गोळी थेट महेश दत्तात्रय पवार (वय २३) यांच्या उजव्या पायाच्या मांडीत घुसली. रक्तस्राव होत असतानाच “अपघात झाला” अशी खोटी कथा रचत अझहरने महेशला घाटी रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांपासून पोलिसांपर्यंत सगळीच कथा फार वेळ टिकली नाही. एम.एल.सी. अहवालावरून वाळूज पोलिसांनी तपास सुरू केला. जखमी आणि त्याचा सोबती अझहर यांची उत्तरे उडवाउडवीची वाटू लागल्यावर पोलिसांनी अझहरला ताब्यात घेऊन ‘खाक्या’ दाखवताच खरी गोष्ट बाहेर आली.
पोलिसांनी अझहरच्या पडेगाव येथील घरावर छापा टाकून निळ्या ड्रममधून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. विशेष म्हणजे पिस्तुलाच्या मुठीवर काळा स्टारही आढळून आला—पण तो फिल्मी नव्हे, तर थेट गुन्हेगारीचा!
या प्रकरणी अझहर सय्यदविरुद्ध भारतीय न्याय संहिता व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून “पिस्तूल खेळणं नाही” असा धडा देत वाळूज पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

