
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे
वाळूज महानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शुक्रवार (दि. ७ फेब्रुवारी) रोजी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतासाठी उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली असतानाच बजाजनगर परिसरात बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मोरे चौक येथील दगडोजीराव देशमुख कॉलेजमधील मतदान केंद्रावर दोन तरुण बोगस मतदान करताना आढळून आले. रोहन चंद्रकांत वाहुलकर (वय २१) आणि बन्सी उमाप (वय २१), दोघेही राहणार भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हे दोघे प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन बोगस मतदान करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, हे बोगस मतदान कोणत्या राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात येत होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
••••
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

