
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : वाळूज महानगर गणेश महासंघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री स्वराज्य प्रतिष्ठानची खेळाडू जिजाऊ दिनेश दुधाट हिने उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन करत उत्कृष्ट यश मिळवले. तब्बल ४० संघांमधून जिजाऊने प्रभावी कामगिरी करत महासंघाचा मानाचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकावला.
हा सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी जिजाऊला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. जिजाऊच्या या यशामागे श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे कबड्डी प्रशिक्षक शिवराज किरकंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या यशाबद्दल नितीन देशमुख, सरपंच सुनील भाऊ काळे, जितू भाऊ दहातोंडे, किशोर भाऊ गायकवाड, उमेश दुधाट, औदुंबर देवडकर, योगेश साळे, विक्रम आळंजकर आदी मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


