वाळूजमध्ये एएनसीची धाड – २५०४ बाटल्या जप्त

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमार्गे नाशिक व मालेगावमध्ये नशेसाठी औषधांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अँटी नार्कोटिक्स सेल (एएनसी) पथकाने केला. शुक्रवारी (दि. १२) वाळूज येथील एका नामांकित लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामावर मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या कारवाईत तब्बल २५०४ बाटल्या (२० खोके) जप्त करण्यात आल्या.
औषध प्रतिनिधींचा तस्करीकडे मोर्चा
चाळीसगावचे रूपेश पाटील आणि अवी पाटील हे दोघे भाऊ मूळचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर). दोन वर्षांपूर्वी मेडिकल बंद झाल्यानंतर त्यांनी जुनी ओळख वापरून उत्तर प्रदेशातून गुंगी आणणाऱ्या औषधांची मागणी सुरू केली. नंतर त्यांनी या औषधांचा पुरवठा स्थानिक विक्रेत्यांना तर मोठ्या प्रमाणावर नाशिक व मालेगावला सुरू केला. शुक्रवारी वाळूजमध्ये माल घेण्यासाठी ते येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच एएनसीने सापळा रचून छापा मारला. यावेळी एका भावासह चौघांना पकडण्यात आले. दुसऱ्या भावासाठी विशेष पथक नाशिकला रवाना झाले आहे.
गुप्ततेतून धडाकेबाज कारवाई
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे व उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत उपायुक्त पंकज अतुलकर यांनीही कारवाईचा आढावा घेतला.
तस्करीची साखळी – नशेचे रेट कार्ड
• ₹१७५ : औषधाची मूळ किंमत
• ₹४० : तस्करांकडून खरेदी दर
• ₹१४० : पेडलर्सना विक्री दर
• ₹४०० ते ₹५०० : नशेखोरांना अंतिम विक्री
या कारवाईत जप्त झालेल्या बाटल्यांत कोडीन फॉस्फेट हे मॉर्फिनसदृश औषध होते. वेदना कमी करणे व तीव्र खोकल्यावर नियंत्रण मिळवणे यासाठी हे औषध दिले जाते. परंतु याचा गैरवापर झोप, नशा निर्माण करतो तसेच श्वसन प्रक्रिया मंदावण्याचा धोका वाढवतो. प्रिस्क्रिप्शनशिवाय याचा वापर कायद्याने गुन्हा असून सततच्या सेवनामुळे व्यसन व गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
या धाडीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की छत्रपती संभाजीनगर हे अमली पदार्थांच्या तस्करीसाठी महत्त्वाचे केंद्र बनत चालले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


